कोकणाची लाल माती ही अनेक गुणांची उपज करणारी आहे. इथल्या निसर्गातच संगीत व्यापून उरलं आहे. रानावनातून भणाणणारा वारा, निर्मळ झऱ्यांचे खळाळत वाहणे, विशाल सागराची गाज आणि पक्ष्यांचे मधुर कूजन अशा सर्वत्र व्यापून उरणाऱ्या वातावरणात मनुष्य या सर्वांपासून अलिप्त कसा राहील? निसर्गातच ज्यांचा भरपूर वावर आहे, निसर्गावर ज्यांचं जीवन अवलंबून आहे अशा धनगर समाजाचं निसर्गाशी असलेलं नातं त्यांच्या धनगरी नृत्यामधूनही व्यक्त होत राहातं.

नवरात्र उत्सवात एका विशिष्ट दिवशी धनगर लोक समूहाने गावातील घरांमधे जाऊन आपले नृत्य सादर करतात. अनोखी वेशभूषा करून, वैशिष्ट्यपूर्ण गिरक्या घेत केलेलं त्यांचं नृत्य हे तालाचा व लयबद्ध हालचालींचा ताळमेळ घालत रत्नागिरीत अनेक ठिकाणी सादर केलं जातं. गिरक्या घेताना गोलाकार फिरणारा झगा अंगाभोवती लपेटून नाचणारा धनगरी नर्तक पाहून आपल्याच विश्वात आनंदाने रमणाऱ्या एखाद्या अवलीयाची आठवण होते. डफ, झांजा अशा वाद्यांच्या तालावर एकत्र जमून समूहाने हे नृत्य सादर केले जाते. अंगभर पांढरीशुभ्र वेशभूषा करून केले जाणारे `धनगरी नृत्य` हे तालबद्ध पदन्यास व वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेसाठी आवर्जून बघावे असे आहे.

अनुभवण्यासारखे खूप काही

मांसाहारी

चला तर मग!

केळशी समुद्रकिनारा

चला तर मग!

मसाल्याचे पदार्थ

चला तर मग!
Positive SSL