रत्नागिरीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडेचा आनंद मनमुराद लुटता येतो. विविध बोट राईड्स  बरोबरच बनाना राईड्स,  वॉटर स्कूटर्स असे इतरही अनेक साहसी जलक्रीडाप्रकार इथे अनुभवता येतात. मुरुड,  लाडघर,  कर्दे,  गणपतीपुळे,  गुहागर,  भाट्ये अशा अनेक किनाऱ्यांवर आबालवृद्धांपासून सर्वांना या जलक्रीडांचा मनमुराद आनंद लुटता येतो. लाटांवर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने बोटीतून सफर करण्याचा अनुभव खूप रोमांचक असतो तर मित्रमैत्रिणींसकट बनाना राईड्सवर बसून पाण्यात डुबकी घेताना खूप मजा वाटते. संरक्षणाची सर्व काळजी घेऊन खेळले जाणारे हे जलक्रीडाप्रकार आपल्यात कुठेतरी लपलेले आपले  अवखळ बालपण पुन्हा जागे करतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

याकूतबाबा दर्गा, केळशी

चला तर मग!

बुधल सडा

चला तर मग!

श्री दशभुजा गणेश, हेदवी

चला तर मग!
Positive SSL