गिरीभ्रमण व पदभ्रमणासाठी रत्नागिरी जिल्हा हा एक उत्तम पर्याय आहे. पूर्वेला असणारा विशाल सह्याद्री  पर्वतप्रेमींना कायम आव्हान देत असतो. रत्नागिरी जिल्ह्यात महिपतगड, सुमारगड,  रसाळगड,  प्रचीतगड असे अनेक डोंगरी किल्ले आहेत. तसेच लांजा तालुक्यातील नव्याने विकसित होत असलेले माचाळ हे ठिकाण तर पावसाळ्यात चुकवून चालत नाही. हिरव्या डोंगरराजीत धुक्याने वेढलेले माचाळ अवर्णनीय दिसते.

पावसाळ्यात पाचू हिरवा सह्याद्री पांढऱ्याशुभ्र जलधारा लेऊन जणू स्वर्गीयच भासतो. मात्र या भटकंतीसाठी स्थानिक माहीतगार माणूस बरोबर असणे महत्त्वाचे. रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग माऊंटेनियर्स किंवा कोल्हापूरमधील कोल्हापूर हायकर्ससारख्या काही संस्था या भागात कायम पदभ्रमणाचे कार्यक्रम आयोजित करत असतात.

अनुभवण्यासारखे खूप काही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक

चला तर मग!

होळी व शिमगोत्सव

चला तर मग!

सवतसडा धबधबा, चिपळूण

चला तर मग!
Positive SSL