रत्नागिरी जिल्ह्याची सायकलीवर सफर करणे हा एक विसरता न येणारा अनुभव आहे. नोव्हेंबर ते मार्च हा काळ सायकलीवरून भटकंतीसाठी उत्तम असतो. गुलाबी थंडी... धुक्यात लपेटलेली सकाळ.. कधी दाट झाडीतून, तर कधी प्रशस्त जांभ्याच्या सड्यांवरून, कधी दमछाक करणाऱ्या घाटरस्त्याने, तर कधी अथांग समुद्राला साक्षी ठेवत केलेली ही भटकंती संस्मरणीय ठरते. येथील बहुरंगी समाजजीवन अनुभवत, निसर्गाशी संवाद साधत सायकलीवरून रत्नागिरी जिल्ह्याची भटकंती एकदातरी करायलाच हवी.

वाटेतील अनेक प्राचीन मंदिरे, गड-किल्ले, वेड लावणारे सागरतीर, कोळीजीवन, नारळी-सुपारीच्या बागा, टुमदार कोकणी गावं हे सर्व कॅमेऱ्यात साठवून आठवणींचा खजिना बरोबर घेऊन आपापल्या घरी परतावं....पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठीच!

वळणावळणाचे घाटरस्ते, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, कमी वर्दळीचे अंतर्गत रस्ते, वाटेत लागणाऱ्या खाडीपुलांवरून दिसणारे विहंगम दृश्य हे सर्व आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याच्या मोटरसायकलवर केलेल्या भटकंतीमध्ये अनुभवता येईल. आपल्याला अचानक आलेल्या कोणत्याही अडचणीच्या वेळी इथला स्थानिक माणूस मदतीसाठी सदैव तत्पर असतो.

तुमच्याकडे एक चांगली मोटारसायकल असेल, निसर्गाची आवड असेल, थोडा वेळ व पैसे असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहसी वृत्ती असेल तर मग वाट कशाची पाहाताय? बाईकवर स्वार व्हा आणि या रत्नागिरीला! बायकिंग आवडणाऱ्या साहसवेड्यांसाठी रत्नागिरी जिल्हा म्हणजे जणू स्वर्गच!

अनुभवण्यासारखे खूप काही

रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी

चला तर मग!

श्री क्षेत्र पावस, रत्नागिरी

चला तर मग!

फुलपाखरे व कीटकजगत

चला तर मग!
Positive SSL