प्राचीन लेण्यांचा अभ्यास करताना ती कोणत्या काळात खोदली गेली आहेत हे बघणं  महत्त्वाच ठरतं. पांडवकालीन, बौद्धकालीन, हीनयानकालीन असे लेण्यांचे विविध काळ सांगता येतात. खेड तालुक्यातील बौद्धकालीन शिल्पांशी साम्य असलेली खेडची लेणी प्रसिध्द असून ती खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. लेण्यांचे काम अर्धवट असून, त्यामधे दोन स्तंभ, एक अर्धस्तंभ आणि एक चैत्य आहे. लेण्यांमधे तीन कक्ष असून, खूप पूर्वी ही लेणी व्यापारी मार्गावर ये जा करणाऱ्या वाटसरूंसाठी विश्रांतीस्थान म्हणून वापरली जात असावीत असा अंदाज आहे

तालुका - खेड

बस स्थानक - खेड

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - वर्षभर 

अनुभवण्यासारखे खूप काही

ओझरकडा धबधबा, राजापूर

चला तर मग!

वेळणेश्वर मंदिर, गुहागर

चला तर मग!

श्री दशभुजा गणेश, हेदवी

चला तर मग!
Positive SSL