कोकणाचा कल्पवृक्ष म्हणजे नारळ किंवा माड. शहाळ्याचे गोड पाणी तहान तर शमवतेच परंतु त्याच्या गोड खोबऱ्याशिवाय कोकणातील गृहिणीचा एकही पदार्थ पूर्ण होऊ शकत नाही.

नारळाचा कोणताही भाग वाया जात नाही व त्याच्या प्रत्येक भागापासून अनेक उपयोगी वस्तू बनवता येतात. जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान, जमिनीचा खारटपणा, वाळूमिश्रीत लाल माती हे सर्व घटक नारळाच्या भरघोस उत्पादनासाठी अनुकूल आहेत. समुद्रकिनाऱ्यावर व कोकणी वाड्यांमधे सर्वत्र माडांच्या दाट राया आढळतात व येथे नारळाचे भरपूर उत्पादन होते.

रत्नागिरीतील भाट्येजवळचे `नारळ संशोधन केंद्र’ नारळाच्या विविध जातींवर होणाऱ्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. भारतभरातून अनेक अभ्यासू येथे दरवर्षी भेट देतात. येथील बनवली, सिंगापुरी, गुहागरी इ.नारळाच्या जाती प्रसिध्द आहेत.

अनुभवण्यासारखे खूप काही

गरम पाण्याचे झरे, राजवाडी

चला तर मग!

लाडघर समुद्रकिनारा

चला तर मग!

श्री क्षेत्र मार्लेश्वर, संगमेश्वर

चला तर मग!
Positive SSL