कर्दे किनाऱ्यपासून दक्षिणेस ६ किमी अंतरावर लाडघरचा वैशिष्ट्यपूर्ण किनारा आहे. इथे समुद्रात साहसी जलक्रीडा प्रकारांचा मनसोक्त आनंद घेता येतो. बनाना राईड, वॉटर स्कूटर, पॉवर बोट हे सगळं अनुभवायचं आणि तेही फेसाळणाऱ्या लाटांवर आरूढ होऊन! पुनःपुन्हा आनंद घ्यावा असाच हा थरारक अनुभव असतो.

तालुका - दापोली

बस स्थानक - दापोली

रेल्वे स्थानक - खेड

योग्य काळ - ऑक्टोबर ते मे

किनाऱ्याच्या सुरूवातीचा काही भाग हा लालसर रंगांच्या छोट्याछोट्या दगडांनी व्यापलेला आहे आणि नंतर वाळूची प्रशस्त पुळण सुरू होते.

फेसाळणाऱ्या लाटांशी मनसोक्त खेळल्यावर पोटात उसळलेल्या भुकेचा आगडोंब शांत करण्याकरता मत्स्यप्रेमींसाठी खास कोकणी चवीचे मासळीचे विविध प्रकार आणि शाकाहारींसाठी डाळिंबीची उसळ, मोदक, तांदळाची भाकरी, सोलकढी असा घरगुती कोकणी मेन्यू सुध्दा सर्वत्र उपलब्ध आहे. जेवणावर यथेच्छ् ताव मारून सुस्त झोपावं ते सकाळी परत समुद्रात उतरण्यासाठीच!

अनुभवण्यासारखे खूप काही

मुरूड समुद्रकिनारा

चला तर मग!

जयगड, रत्नागिरी

चला तर मग!

मामाचं गाव, तुरळ

चला तर मग!
Positive SSL