सुमारे २०० फूट खोल फेसाळत्या समुद्राच्या लाटा, समुद्रातील मासेमारी करणाऱ्या कोळ्यांच्या छोट्या बोटी या पार्श्वभूमीवर कड्याच्या एका टोकापासून जवळजवळ २५० फूट दूर असणाऱ्या दुसऱ्या टोकास बांधलेल्या दोराच्या सहाय्याने दरी ओलांडण्याचा थरार अनुभवायचा आहे? तर मग रत्नागिरीजवळील भाट्ये समुद्रकिनाऱ्याजवळ रत्नदुर्ग माउंटेनिअर्स या संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या व्हॅली क्रॉसिंग शिबिरास भेट द्यायलाच हवी.

सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊन आयोजित केलेल्या या शिबिरात संस्थेचे अनुभवी मार्गदर्शक बरोबर असतात. यासाठी वापरली जाणारी साधने तपासून घेतलेली असतात. दोरीच्या सहाय्याने दरीवरून जाताना खोलवर खाली फेसाळणारा विशाल दर्या,  हिरवीगार वनश्री,  भाट्ये किनाऱ्यावर चालेलेली पर्यटकांची धमाल हे सर्व उंच हवेत लटकत असताना बघणे हा अनुभव थरारक असतो.

अनुभवण्यासारखे खूप काही

कातळशिल्पं (खोदचित्रे)

चला तर मग!

पन्हाळेकाजी लेणी

चला तर मग!

अंजनवेल, गुहागर

चला तर मग!
Positive SSL